ग्रंथालय योजनेच्या लाभासाठी  20 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव पाठवा 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 8 डिसेंबर 2019

राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांच्या विकासासाठी ग्रंथालय संचालनालयामार्फत अर्थसाह्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. अर्ज 20 डिसेंबरपर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास पाठवावेत, असे आवाहन राज्याचे प्रभारी ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी केले आहे.

औरंगाबाद - केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांच्या विकासासाठी ग्रंथालय संचालनालयामार्फत अर्थसाह्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे अर्ज 20 डिसेंबरपर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास पाठवावेत, असे आवाहन राज्याचे प्रभारी ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी केले आहे.

2019-20 साठीच्या असमान निधी योजनेअंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी अर्थसाह्य मिळते. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करणे, महोत्सवी वर्ष साजरे करणे, राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रम, बालग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्यासाठी अर्थसाह्य मिळते.

हेही वाचा - आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या युवकांचे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत

सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी वरील संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करावा तसेच संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरीलपैकी कुठल्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्‍यक कागदपत्रांसह इंग्रजी/हिंदी भाषेत चार प्रतींत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास पाठवावेत, असे श्री. राठोड यांनी पत्रात म्हटले आहे. 

हेही वाचा - अवैध दारूविक्री बंदसाठी महिलांचे उपोषण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the benefit of the Library Scheme Send the proposal by December 20