एटीएम, क्रेडिट कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगत घातला जातो गंडा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

ही घ्या काळजी 
कोणत्याही बॅंक ग्राहकाला क्रेडिट कार्ड, एटीएम, खातेक्रमांक, ओटीपीच्या माहितीबाबत फोन करीत नाही. आपल्याला अशी माहिती विचारण्यास फोन आल्यास तो फसवणुकीचा असल्याचे समजावे, अशी माहिती मागणाऱ्यास कोणतीही माहिती देऊ नये. माहिती मागणाऱ्याची तत्काळ पोलिसांत तक्रार नोंदवावी, असे आवाहन बॅंकेतर्फे केले जात आहे.

औरंगाबाद - ‘हॅलो, मी बॅंकेतून बोलतोय! नवीन धोरणानुसार तुमचे जुने डेबिट किंवा क्रेडिट कार्ड बंद करण्यात येणार आहे. ते सुरू ठेवायचे असेल तर तुम्हाला आलेला ओटीपी क्रमांक सांगा,’ अशी थाप मारून ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. सध्या सर्वच बॅंकांनी जुने मॅग्नेटिक एटीएम कार्ड बंद करून नवीन चीप बेस एटीएम कार्ड वापरात आणले आहेत. ही बाब सायबर भामट्यांच्या पथ्यावर पडत आहे. त्यामुळे बॅंकेच्या नावाखाली फोन आल्यास कोणतीही माहिती न देता थेट बॅंकेत किंवा पोलिसांना कळवावे, असे आवाहन बॅंकांकडून करण्यात आले आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशानुसार सर्व बॅंकांनी मॅग्नेटिक स्ट्रिपवाले डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डला बदलण्याचे आदेश दिले होते. मॅग्नेटिक स्ट्रिपवाले एटीएम कार्ड ३१ डिसेंबर २०१८ पासून बंद झाले. त्याऐवजी आता चीप बेस एटीएम कार्ड नवीन वर्षापासून वापरण्यास सुरवात झाली आहे. सध्या सर्वच बॅंकांमध्ये एटीएम कार्ड बदलून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याने बॅंकांकडून जुने मॅग्नेटिक एटीएम कार्ड ब्लॉक केले जात आहे.

 याचा फायदा घेत ग्राहकांना फसवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. जर तुम्ही जुने एटीएम कार्ड नष्ट न करता फेकून दिले असेल, तर तुमच्या बॅंक खात्यातील पैसा असुरक्षित असल्याचे समजावे. यासाठी ग्राहकांनी जुने एटीएम कार्ड बॅंकेत जाऊन ब्लॉक करावे. त्यानंतरच ते नष्ट करावे, जेणेकरून तुमची फसवणूक आणि खात्यातील पैसा सुरक्षित राहील, असेही बॅंकेतर्फे कळविले जात आहे.

ही घ्या काळजी 
कोणत्याही बॅंक ग्राहकाला क्रेडिट कार्ड, एटीएम, खातेक्रमांक, ओटीपीच्या माहितीबाबत फोन करीत नाही. आपल्याला अशी माहिती विचारण्यास फोन आल्यास तो फसवणुकीचा असल्याचे समजावे, अशी माहिती मागणाऱ्यास कोणतीही माहिती देऊ नये. माहिती मागणाऱ्याची तत्काळ पोलिसांत तक्रार नोंदवावी, असे आवाहन बॅंकेतर्फे केले जात आहे.

Web Title: Beware of fraud