खबरदार..! डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी विक्री कारल तर

File Photo
File Photo

नांदेड : रुग्णाने कोविड-१९ ची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ला, चिठ्ठीशिवाय सर्दी, ताप, खोकला या आजारांवरील औषधींची विक्री करू नये. तसेच बिलाशिवाय औषधींची विक्री करू नये, अशा सूचना जिल्ह्यातील सर्व औषधी विक्रेत्यांना अन्न व औषधी प्रशासन सहायक आयुक्त (औषधी) मा. ज. निमसे यांनी दिल्या आहेत. तर सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींना डॉक्टरांच्या चिठ्ठी व औषधींची खरेदी करू नये, असे आवाहन नागरिकांना केले आहे.

सध्या राज्यात व देशात कोविड-१९ चा संसर्ग वाढत असून त्यावर नियत्रंण मिळविण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. कोविड- १९ चा संसर्ग झालेल्या रुग्णास सर्दी, खोकला, अति ताप, श्वास घेण्यास अडथळा आदी लक्षणे दिसून येतात.

कायद्यातील तरतुदीनुसार त्याची नोंद ठेवण्यात यावी

सर्दी, खोकला, ताप या आजारांवरील औषधी ग्राहक स्वतः औषधी दुकानांवर जाऊन खरेदी करून स्वत: उपचार करतात. त्यामुळे कोविड-१९ या रोगाने बाधित व्यक्ती सुद्धा स्वयंउपचार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रोगाचा अटकाव न होता त्याचा संसर्ग इतर व्यक्तींना होऊ शकतो. डॉक्टरांच्या चिठ्ठीवर औषधी विक्री करते वेळेस औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील तरतुदीनुसार त्याची नोंद ठेवण्यात यावी.

सूचनांचे पालन न केल्यास  कायद्यानुसार कार्यवाही

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय एखादी व्यक्ती औषधींची मागणी करत असल्यास त्यांना शासकीय रुग्णांलयात जाण्यास सांगण्यात यावे. या सूचनांचे औषधी विक्रेत्यांने काटेकोरपणे पालन करावे. सूचनांचे पालन करत नसल्याचे आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे सहायक आयुक्त (औषधी) मा. ज. निमसे यांनी कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com