पिककर्ज नाकारल्याने बँकेसमोरच कीर्तन, भजन करून निषेध

दिलीप गंभीरे
मंगळवार, 10 जुलै 2018

कळंब (उस्मानाबाद) : महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या शिराढोण (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील शाखेने शेतकऱ्यांना पिककर्ज नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १०) बँकेच्या शाखेसमारे कीर्तन, भजन करून निषेध केला.

कळंब (उस्मानाबाद) : महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या शिराढोण (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील शाखेने शेतकऱ्यांना पिककर्ज नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १०) बँकेच्या शाखेसमारे कीर्तन, भजन करून निषेध केला.

खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यामुळे शेतकरी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शिराढोण येथील शाखेमध्ये पिककर्जासाठी हेलपाटे मारत आहेत. परंतु या शाखेने कळंब तालुक्यातील शिराढोण, रांजणी, वाकडी, सौंदना, ताडगाव येथील शेतकऱ्यांना पिक कर्ज नाकारले, त्यामुळे शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखेचा निषेध म्हणून आणि पिक कर्जासाठी बॅंकेच्या दारासमोर कीर्तन, भजन केले.

पिक कर्ज वाटप होत नसल्याच्या अन्यायाविरोधात शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने बॅंकेच्या दारासमोर कीर्तन, भजन करून बॅंकेचा परिसर दणाणून सोडला. शेतकऱ्यांना शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे सरसकट पिक कर्जाचे शेतकऱ्यांना वाटप करावे, अशी या गावांतील शेतकऱ्यांची मागणी आहे. पिक कर्जासाठी बॅंकेकडे वारंवार शेतकरी चकरा मारत आहेत. मात्र शाखाधिकाऱ्यांकडून बॅंकेचे धोरण पुढे करून पिक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी बॅंकेच्या दारासमोर कीर्तन, भजन करून बॅंकेचा परिसर दणाणून सोडला.

Web Title: bhajan and kirtan behind bank for rejecting loan