व्यापाऱ्यांनी मागितले संरक्षण : भारत बंदमध्ये सहभाग नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

बुधवारच्या भारत बंदमधे आम्ही सहभागी होणार नाही. बाजारपेठ व दुकाने बंद न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही बंदमध्ये सहभागी नसल्याचे आम्हाला संरक्षण द्यावे; तसेच आमचे काही नुकसान आंदोलनकर्त्यांनी केले तर प्रशासन व आंदोलनकर्ते त्यास जबाबदार राहतील.

अहमदपूर : शहरातील व्यापारी बुधवारी (ता. 29) होणाऱ्या भारत बंदमध्ये सहभागी होणार नाहीत. दरम्यान, या दिवशी आंदोलनकर्त्यांनी नुकसान करू नये यासाठी पोलिस संरक्षण द्यावे, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी शहरातून फेरी काढत मंगळवारी (ता. 28) तहसीलदारांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले, बुधवारच्या भारत बंदमधे आम्ही सहभागी होणार नाही. बाजारपेठ व दुकाने बंद न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही बंदमध्ये सहभागी नसल्याचे आम्हाला संरक्षण द्यावे; तसेच आमचे काही नुकसान आंदोलनकर्त्यांनी केले तर प्रशासन व आंदोलनकर्ते त्यास जबाबदार राहतील.

क्लिक करा - घाटीत पुन्हा तोडफोड, डॉक्टरला...  

यावेळी ऍड. सचिन करकनाळे, सचिन पांचाळ, संजय मुसळे, संपन्न कुलकर्णी, मंजित बेंबडे, दीपक हालसे, विनोद भुतडा, राजकुमार पुणे, गोविंद कडवादे, राजू कल्याणी, घनश्‍याम भुतडा, राहुल गादेवार, राघवेंद्र गादेवार, अक्षय काडवादे, सदाशिव कराड, परमेश्वर गंगापूर, नरेंद्र चोले, ओम पुणे, धनराज कोटगिरे, प्रवीण हामने, राजू मुळे, कैलास मजरे, संजय मुक्कावर, अनिल घोडके, प्रफुल कल्याणी, विजय सोनी, प्रवीण महामुनी, अश्विन आंधळे, राम रत्नपारखे, नवनाथ हांडे, प्रशांत महाजन, सुशांत गुणाले, प्रवीण डांगे, श्‍याम यादव, पवन सोनी, दीपक बजाज, प्रदीप वट्टमवार, अजय सांगवीकर, शिवा कासले, सुनील फुलारी, अमित रेड्डी, बालाजी आगलावे, सोनू पाटील, रामेश्वर पुणे, माधव वलसे, महेश भुतडा, विष्णू कमठाणे, पवन मालू, गजानन गंगथडे, संजय तत्तापुरे, अनिकेत फुलारी, गिरीश गादेवार, योगेश बाहेती, बालकृष्ण बुलबुले, लक्ष्मण अलगुले, संदीप चौधरी, स्वप्निल व्हत्ते, मधुकर धडे, रामप्रसाद आय्या, अमित जगानी, हेमंत शिंदे, शुभम ढेले आदींची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat Bandh By Bahujan Kranti Morcha Ahmedpur Latur News