सरकार उलथवून टाका - धनंजय मुंडे

परळी वैजनाथ - पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ परळी शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या फेरीत सहभागी झालेले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह बाजीराव धर्माधिकारी, चंदुलाल बियाणी, अजय मुंडे आदी.
परळी वैजनाथ - पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ परळी शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या फेरीत सहभागी झालेले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह बाजीराव धर्माधिकारी, चंदुलाल बियाणी, अजय मुंडे आदी.

परळी वैजनाथ - पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांना जगणे सरकारने अवघड केले आहे. हे सरकार उलथवून टाकल्याशिवाय आता पर्याय उरला नाही, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर कडाडून टीका केली. 

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ देशातील २१ पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या देशव्यापी संपास परळीत मोठा प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेत पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली निषेध फेरी काढली. या वेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून फेरीला सुरवात झाली. मोंढा मार्केट येथे फेरीचा समारोप झाला. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार शरद झाडके यांना देण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे, माऊली गडदे, उपनगराध्यक्ष आय्युबभाई पठाण यांच्यासह वाल्मीक कराड, माणिक फड, मोहनराव सोळंके, चंदुलाल बियाणी, शरद मुंडे, दीपक देशमुख, शेख शरीफ, अनिल अष्टेकर, गोविंद कुकर, जयराज देशमुख, भाऊसाहेब कराड, विजय भोयटे, शंकर आडेपवार, गोपाळ आंधळे, विनोद जगतकर, अजिज कच्छी, संजय फड, अनंत इंगळे, के. डी. उपाडे, दत्तात्रय गुट्टे, महेंद्र रोडे, अर्चना रोडे, रेश्‍मा गित्ते, चित्रा देशपांडे, अन्नपूर्णा जाधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com