Bharat Bandh : 'सस्ती दारू महंगा तेल'च्या घोषणा

hingoli
hingoli

हिंगोली : 'वाह रे सरकार तेरा खेल सस्ती दारु महंगा तेल' अशा घोषणा देत काँग्रेस राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या पदाधिकारी व नेत्यांनी हिंगोली शहरातून सोमवारी (ता. 10) रॅली काढून भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस व राष्ट्रवादी तसेच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदला हिंगोली शहरांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला आहे या बंदमध्ये शहरातील सर्वच व्यापारी सहभागी झाले आहेत. सकाळ पासूनच व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. आमदार डॉक्टर संतोष टारफे पालिकेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण नगरसेवक अनिल नेनवाणी, विलास गोरे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे संचित गुंडेवार जावेद राज यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहरातून फेरी मारली. ज्या ठिकाणी व्यापारी प्रतिष्ठाने उघडे असतील त्या ठिकाणी तातडीने दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.

आजच्या बंदमध्ये शहरातील सर्वच पेट्रोल पंप सहभागी झाले होते. शहरातील पेट्रोल पंपावरून इंधन विक्री झाली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरांमध्ये आलेल्या दूध विक्रेते भाजीविक्रेत्यांची त्यांची मोठी अडचण झाली मात्र या बंदचा वाहतूक व्यवस्थेवर कुठलाही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. येथील आगारातून सर्व बसगाडया नियमितपणे सुरू असल्याचे आगाराच्या सूत्रांनी सांगितले. याशिवाय शाळा महाविद्यालय देखील सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com