उदगीरात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

सचिन  शिवशेटे 
Tuesday, 8 December 2020

महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी (ता.८) शिवाजी चौकातून रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. अडत बाजार कडकडीत बंद पाळल्याने बाजार परिसरात शुक्कशुकाट दिसून आला.

उदगीर (लातूर) : शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उदगीरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवून भारत बंदला पाठिंबा दर्शविला.

हे ही वाचा : Bharat Bandh Updates : चाकुरात व्यापाऱ्यांनी पाळला भारत बंद
 
महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी (ता.८) शिवाजी चौकातून रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. अडत बाजार कडकडीत बंद पाळल्याने बाजार परिसरात शुक्कशुकाट दिसून आला. तर भाजी मंडई, सराफ बाजार, उद्योग भवन, नगरपरिषद संकुलात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. बंदमध्ये महाविकास आघाडी सह एम.आय.एम. लोकभारती, बहुजन वंचित आघाडी, आम आदमी पार्टी, छावा संघटना, संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना हमाल मापाडी सह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. केंद्र सरकारच्या विरोधात न घोषणा देत निषेध करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्ते सहभागी झाले होते. 

हे ही वाचा : Bharat Bandh Updates : जालन्यात मार्केट सुरू, राजकीय पक्षांच्या पाठिंब्यानंतरही बंदला अल्पसा प्रतिसाद

राष्ट्रवादीच्या बॅनरवरुन निघाल्या दोन रॅल्या

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाने पक्षाचे बॅॅनर,  झेंडे काढल्यामुळे नाराज होऊन राष्ट्रवादीला सोडून आघाडीतील काॅग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी एम.आय.एम. लोकभारती, बहुजन वंचित आघाडी, आम आदमी पार्टी, सह बंदमध्ये सहभागी संघटनेला एकञ घेऊन शहरातून रॅली काढली त्यामुळे स्थानिक आघाडीतील कार्यकर्त्यांमधून समन्वय नसल्याचे दिसून आले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Bharat Bandh at Udgir has received a mixed response