esakal | Bharat Bandh Updates : चाकुरात व्यापाऱ्यांनी पाळला भारत बंद
sakal

बोलून बातमी शोधा

In Chakur, traders in the city have responded to the Bharat Bandh.jpg

दिल्ली येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला महाविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात आला.

Bharat Bandh Updates : चाकुरात व्यापाऱ्यांनी पाळला भारत बंद

sakal_logo
By
प्रशांत शेटे

चाकूर (लातूर) : शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत बंद पाळला. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

हे ही  वाचा : Bharat Bandh Update : बीड जिल्ह्यात भारत बंदला काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद, माजलगावमध्ये कडकडीत बंद

दिल्ली येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला महाविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात आला. त्यानुसार मंगळवारी (ता.आठ) सकाळी बाजार समितीपासून कार्यकर्त्यांनी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करीत फेरी काढली. बसस्थानक, बोथी चौक, मुख्य बाजारपेठ येथील दुकाने बंद करून जुन्या बसस्थानकाजवळ तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. नवीन कृषी कायदा रद्द करावा, शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी कायदेशीर तरतुद करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी नुसार कार्यवाही करावी आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

हे ही वाचा : दुभाजकात कचरा टाकल्यास होणार कारवाई, लातूर महापालिकेचा निर्णय

यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुभाष काटे, नगरसेवक गोपाळ माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी काळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष मुर्तुजा सय्यद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल सुरवसे, बालाजी सुर्यवंशी, शिवदर्शन स्वामी, निलेश देशमुख, सलीम तांबोळी, गंगाधर केराळे, सिताराम मोटेराव, भागवत फुले, रियाज पठाण आदी सहभागी झाले होते.

संपादन - सुस्मिता वडतिले