Bharat Jodo Yatra Hingoli : राहुल गांधींनी घेतला सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद

कळमनुरीमध्ये राजीव सातव यांना अभिवादनही, कुटुंबीयांची विचारपूस
राहुल गांधीं
राहुल गांधींsakal

कळमनुरी : भारत जोडो यात्रेचा रविवारी विश्रांतीचा दिवस होता. शहरात मुक्कामी असलेल्या, काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर बालदिनाच्या पूर्वसंध्येला मुलांसाठी सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी काहीक्षण ड्रम वादनातही उत्सुकता दाखवली.

भारत जोडो यात्रा येथे मुक्कामी असून राहुल गांधी यांनी आजचा दिवस राखीव ठेवला होता. या काळात त्यांनी आपले सहकारी, राजीव सातव यांच्या समाधी स्थळाला भेट दिली. माजी मंत्री रजनी सातव, आमदार डॉ. प्रज्ञा सातव, पुष्कराज सातव आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी सातव कुटुंबीयांशी चर्चा केली.

जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी आयोजित केलेल्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली. सांस्कृतिक कार्यक्रमात मुंबई येथून आलेल्या कलावंतांनी गाणी, नृत्य, चित्र आदी कलाविष्कार सादर केले. यावेळी राहुल गांधी यांनी व्यासपीठावर जात संबंधित कलावंतासोबत ड्रमवादन केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गर्दी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com