

bharatbhushan kshirsagar
esakal
Beed Nagar Palika Election: बीडसह सर्वत्र निवडणुकांच्या चर्चा रंगलेल्या आहेत. डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे नाव बीड जिल्ह्यासह राज्याला चांगलंच माहिती आहे. कारण या माणसाने एक-दोन नव्हे तर तब्बल ३५ वर्षे बीड नगर पालिकेवर सत्ता गाजवली. मग परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, क्षीरसागर बीडचा गड जिंकणार म्हणजे जिंकणार. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टर भारतभूषण हे राजकारणापासून अलिप्त आहेत. त्यामुळे त्यांचे चिरंजीव डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना एकाकी लढा द्यावा लागतोय.