दंगलीचे तेवीस गुन्हे मागे घेण्याची शासनाकडे शिफारस 

Koregaon Bhima
Koregaon Bhima

औरंगाबाद - भीमा-कोरेगावप्रकरणी जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून औरंगाबादेत उसळलेली दंगल तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या काळात घडलेल्या दंगलीत दाखल गुन्ह्यांपैकी तेवीस गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाकडून शासनाला शिफारस करण्यात आली आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती गुरुवारी (ता. १५) विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

भीमा-कोरेगाव प्रकरणाचे पडसाद नवीन वर्षात पहिल्या दिवशी शहरात उमटले. तीन दिवस शहर दंगलीत धुमसत होते. या काळात मोठी दगडफेक व जाळपोळ झाली. दंगलीत दाखल गुन्ह्यांतील संशयितांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतची शिफारस शासनाकडे पाठविण्यात आली. तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी घडलेले अनुचित प्रकार व त्यात दाखल झालेले गुन्हेही मागे घेण्याची शिफारस पोलिस आयुक्तालयामार्फत शासनाकडे करण्यात आली. एकूण ४८ गुन्हे या दोन्ही दंगलींच्या कालावधीत दाखल झाले होते.

गुन्हे मागे घेण्याचे निकष
मराठा क्रांती मोर्चादरम्यान दाखल दहापैकी नऊ गुन्हे मागे घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच भीमा-कोरेगावच्या पडसादानंतर दाखल ३८ पैकी १४  गुन्हे मागे घेण्याचे शिफारशीत नमूद आहे. सुमारे दहा लाखांपेक्षा कमी नुकसान झालेले व त्याची भरपाई देण्याची तयारी दर्शविणाऱ्यांचेच गुन्हे मागे घेण्यात यावेत, असे यात नमूद आहे. दरम्यान, दहा लाखांपेक्षा जास्त नुकसान झालेले व पोलिसांवरील हल्ल्यांचे गुन्हे मात्र मागे घेण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरात दाखल गुन्हे 
मराठा क्रांती मोर्चा 

पुंडलिकनगर    १
सिडको    २
एम. सिडको    १
सातारा    १
दौलताबाद    १ 
जवाहरनगर    १
हर्सूल     २

भीमा-कोरेगाव
सिटी चौक    ४
क्रांती चौक    ५ 
बेगमपुरा    १
दौलताबाद    २
सिडको    २
जिन्सी    ४
हर्सूल    १
मुकुंदवाडी    ४ 
पुंडलिकनगर    १
जवाहरनगर    ३
सातारा     ३
एम. वाळूज    ३ 
उस्मानपुरा     ५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com