लाच मागणारा तलाठी जाळ्यात; भोकर ठाण्यात गुन्हा दाखल 

प्रल्हाद कांबळे 
रविवार, 30 डिसेंबर 2018

भोकर तालुक्यातील रहाटी सज्जाचे लाचखोर तलाठी व्ही. एस. गलंडे यांच्या कार्यालयात एक तक्रारदार आपल्या कामासाठी गेले. त्यांचे काम असे होते की, आई- वडिलाच्या नावे असलेली शेती तक्रारदार, त्यांचे तीन भाऊ आणि बहिण यांच्या नावे फेरफार करून सातबारावर नोंद घेण्यासाठी गेले होते.

नांदेड : आई- वडिलाच्या नावे असलेली शेती भाऊ व बहीणीच्या नावे करून ती सातबारावर घेण्यासाठी लाच मागणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला. मागणी निष्पन्न झाल्याने तलाठी व्ही. एस. गलंडे याच्याविरूध्द शनिवारी (ता. २९) गुन्हा दाखल झाला.

भोकर तालुक्यातील रहाटी सज्जाचे लाचखोर तलाठी व्ही. एस. गलंडे यांच्या कार्यालयात एक तक्रारदार आपल्या कामासाठी गेले. त्यांचे काम असे होते की, आई- वडिलाच्या नावे असलेली शेती तक्रारदार, त्यांचे तीन भाऊ आणि बहिण यांच्या नावे फेरफार करून सातबारावर नोंद घेण्यासाठी गेले होते. परंतु तलाठी याने वारसाप्रमाणे प्रत्येकी चार हजार रुपयाची लाच मागिलती. मात्र ही लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रादाराने नांदेड येथे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी पडताळणी सापळा लावला. यावेळी तलाठी श्री. गलंडे यानी तडजोडअंती प्रत्येकी तीन हजाराची मागणी केली. ही मागणी पडताळणी सापळ्यात निष्पन्न झाल्याने पोलिस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या फिर्यादीवरून भोकर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस उपाधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद उलेमाले, भूजंग गोडबोले, कर्मचारी मारोती केसगीर, हनमंत बोरकर, गणेश तालकोकुलवार, अमरजीतसिंग चौधरी आणि शेख मुजीब यांनी परिश्रम घेतले.

Web Title: bhokar talathi arrested for taking bribe