बिलोलीचा ग्रामसेवक लाचेच्या जाळ्यात 

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 17 मार्च 2020

ग्रामसेवक संभाजी हलदेवाड याने १५ हजारांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. १६) मार्च अटक केली.

नांदेड : बिलोली तालुक्यातील मुतण्याळ येथील तक्रारदाराच्या घरासमोरील व मोकळी जागा ग्रामपंचायतच्या नमुना नं ८ च्या रजिस्टरला नोंद करून नमुना नंबरचा उतारा देण्यासाठी येथील ग्रामसेवक संभाजी हलदेवाड याने १५ हजारांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. १६) मार्च अटक केली. 

बिलोली तालुक्यातील मुतण्याळ येथील तक्रारदाराच्या घरासमोरील जागा व मोकळी जागा ग्रामपंचायत कार्यालयातील नमुना नंबर ८ च्या रजिस्टरला नोंद करण्यासाठी १५ हजाराची लाच मागितली. या बाबत तक्रारदाराने नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ग्रामसेवकच्या विरुद्ध ता. १३ मार्च रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बिलोली येथील पंचायत समिती कार्यालय परिसरात सापळा रचून ग्रामसेवक श्री. हलदेवाड याने तक्रारदार याच्या नमूद कामासाठी १५ हजार लाचेची रक्कम खतगाव येथील ग्रामपंचायतचा सेवक तुकाराम वाघमारे यांच्याकडे देण्यास सांगितले. 

हेही वाचानांदेडमध्ये दोन घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

सेवकामार्फत स्विकारली लाच 

त्यानुसार सदर रक्कम वाघमारे यांनी स्वीकारली. त्याचवेळेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामसेवक संभाजी हलदेवाड व तुकाराम वाघमारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

एसीबीकडून नागरिकांना आवाहन

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, शासकिय अधिकारी व कर्मचारी हे शासकिय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडिओ, आॅडीओ क्लिप असल्यास, भ्रष्टाचार संबंधाने काही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकिय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी शासकिय निधीचा अपहार केला असले तर आमच्या टोल फ्री १०६४ किंवा०२४६४ -२५३५१२ या क्रमांकावर किंवा चलभाष क्रमांक ८९७५७६९९१८ यावर संपर्क साधावा.
विजय डोंगरे, पोलिस उपाधीक्षक, एसीबी, नांदेड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Biloli's village servant in a bribe net nanded news