बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावरून 7 वर्षांनी वाहिले पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 सप्टेंबर 2016

बीड - बीड जिल्ह्यात शुक्रवारी रात्रभर मुसळधार पाऊस पडत असून, यामुळे पाणी साचू लागले आहे. सात वर्षांपासून कोरडे पडलेल्या बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.

 

बीड - बीड जिल्ह्यात शुक्रवारी रात्रभर मुसळधार पाऊस पडत असून, यामुळे पाणी साचू लागले आहे. सात वर्षांपासून कोरडे पडलेल्या बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात रेकाॅर्डब्रेक पाऊस होत आहे. पावसाचा जोर आजही (शनिवार) कायम आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 100.38 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात शनिवारी सकाळपर्यंत गेल्या चोवीस तासांतील पावसाची सरासरी 81.2 मिमी नोंद झाली. जिल्ह्यातील 63 पैकी 41 महसुल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये बीड - 153, पेंडगाव- 180, मांजरसुंबा- 65, पिंपळनेर- 73, पाली- 71, म्हाळसजवळा- 75, पाटोदा- 72, थेरला- 90, अंमळनेर- 116, गेवराई- 81, धोंडराई- 75, उमापूर- 80, पाचेगाव- 95, जातेगाव- 115, तलवाडा- 84, वडवणी- 115, कौडगाव बुद्रूक- 113, अंबाजोगाई- 77, घाटनांदुर- 115, लोखंडी सावरगाव- 79, बर्दापूर- 112, पाटोदा ममदापूर- 70, माजलगाव- 120, गंगामसला- 135, दिंद्रुड- 140, नित्रुड- 115, तालखेड- 106, किट्टी अडगाव- 70, केज- 106, विडा- 103, युसूफ वडगाव- 88, हरिश्चंद्र पिंपरी- 98, होळ- 85, बनसारोळा- 95, नांदुरघाट- 76, धारूर- 95, मोहखेड- 78, तेलगांव- 80, परळी- 88, नागापूर- 100 तर धर्मापुरी येथे 71 मिमी इतकी नोंद झाली आहे.

निम्न दूधना प्रकल्प धरणाचे बारा दरवाजे उघडले

सेलू (परभणी) - निम्न दूधना प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत अाहे. त्यामुळे रात्री बाराच्या सुमारास धरणाच्या धरणाचे अाठ दरवाजे उघडून सात हजार क्युसेसने दूधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात अाला. त्यानंतर पुन्हा धरणाच्या पाणी पातळीत अावक वाढत असल्याने माजलगाव तालुक्यातील उमरी पारगाव गावाचा संपर्क तुटला. 500 लोक पाण्यात अडकले आहेत.

Web Title: Bindusara Dam bore water after 7 years