Mobile Screen Protectors: निकृष्ट दर्जाच्या स्क्रीन गार्डवर बंदी; स्मार्टफोन स्क्रीन प्रोटेक्टरसाठी बीआयएसचे कडक नियम १ एप्रिलपासून होणार लागू

निकृष्ट टेम्पर्ड ग्लासमुळे होणारी फसवणूक रोखण्यासाठी सरकारचे पाऊल; बीआयएस प्रमाणित स्क्रीन गार्डच बाजारात, मात्र दरवाढीची झळ ग्राहकांना बसण्याची शक्यता
Mobile Screen Protectors

Mobile Screen Protectors

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर,: स्मार्टफोनच्या स्क्रीनच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या टेम्पर्ड ग्लास आणि स्क्रीन प्रोटेक्टरमुळे ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२७ पासून बीआयएस नोंदणी नसलेल्या कोणत्याही स्क्रीन प्रोटेक्टरची विक्री, आयात किंवा उत्पादन करण्यावर देशात पूर्णपणे बंदी असणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) अंतर्गत मोबाईल स्क्रीन प्रोटेक्टरसाठी नवीन आणि अनिवार्य गुणवत्ता मानके अधिसूचित केली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com