esakal | हिंगोली : आघाडी सरकार मुडदाबाद म्हणत भाजपचे निदर्शने
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Agitation

हिंगोली : आघाडी सरकार मुडदाबाद म्हणत भाजपचे निदर्शने

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली - हिंगोली येथे भाजपाच्या वतीने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील बुधवारी ता. १५ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुडदाबाद- मुडदाबाद आघाडी सरकार मुडदाबाद म्हणत निदर्शने करून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यांसाठी भाजपच्या वतीने आमदार तान्हाजी मुटकुळे व नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालया समोर महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी बाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले. यावे वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुडदाबाद- मुडदाबाद आघाडी सरकार मुडदाबाद म्हणत जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी गणेश शिंदे, उमेश नागरे, गजानन निरगुडे, माणिक लोडे, मयुर दंडे, रवी पवार, अँड अमोल जाधव, पंकज होडगीर यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: परभणी: शेतकरी संघर्ष समितीचे सत्याग्रह आंदोलन

यावेळी ओबीसीचे राजकिय आरक्षण रद्द होण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला. राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धुळे, नंदुरबार, अकोला वाशिम व नागपूर येथील निवडणूका राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहिर झाल्या या आघाडी सरकारने वेळीच इंपरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर ओबीसी बांधवावर निवडणुकीतून हदपार व्हायची वेळ आली नसती. मात्र, सरकारला ओबीसीचे आरक्षण जाणून बुजून काढून घ्यायचे होते म्हणुन त्यांनी कोर्टाला इम्पेरिकल डेटा दिला नाही ओबीसीचे आरक्षण संपुष्टात आले म्हणजेच या सरकारने मागासवर्गीय आयोग नेमुन कुठलीही आम्ही केवळ ओबीसी समाजासोबत आहोत असा देखावा फक्त राज्यातील आघाडी सरकारनी करून राज्यातील ओबीसी समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला.

ओबीसी समाजाला खोटया आशेवर ठेवुन समाजाची दिशा भुल करून पध्दतशीरपणे ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडनुकितून बाजुला केले म्हणुन या सरकारचा ओबीसी समाजाच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

loading image
go to top