esakal | परभणी: शेतकरी संघर्ष समितीचे सत्याग्रह आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

परभणी: शेतकरी संघर्ष समितीचे सत्याग्रह आंदोलन

परभणी: शेतकरी संघर्ष समितीचे सत्याग्रह आंदोलन

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी: परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त जनतेच्या मागण्याबाबत मराठवाड्यातील पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या भेदभावपूर्ण व्यवहाराच्या निषेधार्थ बुधवारी (ता.१५) शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: मराठवाड्यातील मुख्य पिक 'सोयाबीन' धोक्याच्या पातळीवर

जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि त्या पाठोपाठ गोदावरी, दुधना, पुर्णा, मासोळी, कर्परा, कसुरा, इंद्रायणी गल्हाटी, पिंगळगड नाला आणि इतर सर्व नदी नाले ओढ्याच्या पुरामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हि पूरपरिस्थिती गंभीर होण्यासाठी गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाचे प्रशासन संपूर्णपणे दोषी आहे.

गोदावरी नदी पात्रात माजलगाव प्रकल्पातून सलग तीन दिवस तब्बल १२ लाख लिटर प्रतिसेकंद या वेगाने प्रचंड पाणी सोडण्यात आले. सदर पाणी सोडण्यापूर्वी गोदावरी नदी वरील उच्चस्तर बंधाऱ्यात आधीच १०० टक्के पाणीसाठा होता. धरणातून पाणी सोडण्यापूर्वी बंधाऱ्यांची पाणीसाठा, दरवाजे याबाबत काय स्थिती आहे हेच पाटबंधारे प्रशासनाने समन्वय ठेवला नाही असा आरोप शेतकरी संघर्ष समितीने केला आहे.

यामुळे गोदावरी आणि तिच्या उपनद्या नाले यांच्यात प्रचंड पूर परिस्थिती निर्माण झाली. पूर्णा नदी, दुधना नदीत पाणी सोडतांना असाच बेजवाबदारपणा करण्यात आला. त्यामुळे जे शेतकऱ्यांचे आणि गावकऱ्यांचे लाखो हेक्टर जमिनीवरील पीक उद्वस्त झाले. जनावरे मृत्यमुखी पडली आणि असंख्य लोकांना आपले प्राण गमवावे लागले याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

जनतेस गंभीर पूर परिस्थितीत लोटणाऱ्या कार्यकारी संचालक, गोदावरी सिंचन विकास महामंडळ यांच्या विरुद्ध क्रिमिनल निग्लीजन्स बाबत गुन्हे दाखल करा आणि तात्काळ निलंबित करा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी राजन क्षीरसागर, माणिक कदम, शिवाजी कदम, ओंकार पवार, नवनाथ कोल्हे, प्रकाश गोरे, आसाराम बुधवंत, शेख अब्दुल, ज्ञानेश्वर काळे, चंद्रकांत जाधव, नरहरी काळे, गजानन देशमुख आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

loading image
go to top