भाजपची निती आणि नियत दोन्ही खराब - आबु आझमी 

अनिल जमधडे 
शुक्रवार, 4 मे 2018

औरंगाबाद : भाजपची निती आणि नियतही खराब आहे, तर काँग्रेसची निती ठिक पण नियत खराब आहे, मात्र परिस्थिती पहाता काँग्रेसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे भाजपच्या विरोधात सर्वच पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार आबु आसिम आझमी यांनी केले. 

एमआयएमचे प्रदेशाध्य सय्यद मोईन यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यासाठी आबु आझमी शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळेच देशात भाजप फोफावली आहे. हिंदूराष्ट्र करण्याचे स्वप्न दाखवले जाते, अच्छे दिन आयेंगे अशा भूलथापा देत देशवासीयांची दिशाभूल केल्याने भाजप प्रणित सरकार स्थापन झाले आहे. मात्र आता लोकांना कळून चुकले आहे. आज देशात धार्मिक स्तोम माजले असून, वातावरण अस्थिर झाले आहे. मुस्लिमांना टार्गेट केले जात आहे.

आसिफा प्रकरण काळीमा फासणारी घटना आहे. मंदीरात अत्याचार होतो, आणि अत्याचार करणाऱ्यांना पकडण्यासाठी नव्हे तर त्यांना सोडण्यासाठी गुंडागर्दी केली जाते ही वाईट घटना आहे. त्यामुळेच हे धार्मीक स्त्रोम संपवण्याची गरज आहे, यासाठी समाजवादी पार्टी पुर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. मात्र अजूनही काँग्रेसचे डोळे उघडत नाही. राहूल गांधींना पंतप्रधान व्हायचे असेल तर त्यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

Web Title: bjp bad in Policy and behavior both said by abu azami