हातात घड्याळ घातलेल्या राष्ट्रवादीवाल्यांनी मला विजयी केले- सुरेश धस

मंगळवार, 12 जून 2018

उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सुरेश धस यांनी आपल्या विजयाचे श्रेय भाजप नेतृत्वाबरोबरच राष्ट्रवादीतील फुटीरांना दिले आहे. या मतदारसंघात भाजपपेक्षा राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची 100 मते जास्त होते. हा फरक कमी करुन धस यांनी 78 मतांनी विजय मिळवला. सर्वपक्षीयांनी सहकार्य केल्याचे सांगून हा धनशक्‍तीविरुद्ध जनशक्‍तीचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले

बीड - उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सुरेश धस यांनी आपल्या विजयाचे श्रेय भाजप नेतृत्वाबरोबरच राष्ट्रवादीतील फुटीरांना दिले आहे. या मतदारसंघात भाजपपेक्षा राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची 100 मते जास्त होते. हा फरक कमी करुन धस यांनी 78 मतांनी विजय मिळवला. सर्वपक्षीयांनी सहकार्य केल्याचे सांगून हा धनशक्‍तीविरुद्ध जनशक्‍तीचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. हातात घड्याळ घातलेल्या राष्ट्रवादीवाल्यांनी मला विजयी केले, असे विधान करत राष्ट्रवादीची मते फुटल्याचा दावा त्यांनी केला.

त्याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद या सर्व गोष्टींचा वापर करुनसुद्धा त्यांनी ही निवडणुक जिंकता आली नसल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या निवडणुकीत आयफोन कॅमेरे आणि किचन वाटली आहेत, त्यांनी आता आपले घड्याळ हे चिन्ह बदलून आता कॅमेरा किंवा किचनचे चिन्ह निवडणूक करुन घ्यायला हवे अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली.

विजय मिळवल्यानंतर सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली आहे. त्यांचे नाव न घेता त्यांनी "बाप बाप होता है' असे म्हटले आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद भूषवत असलेल्या धनंजय मुंडेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत धस आणि मुंडे हे राष्ट्रवादीतच होते, मात्र त्यांच्यात सख्य नव्हते. त्यांच्यात पक्षांतर्गत नेतृत्वाचा वाद होता. जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेवेळी धस यांनी पंकजा मुंडे यांना मदत केल्याने धनंजय यांनी धसांना टार्गेट केले होते. दोघांत जोरदार टीकाटिप्पण्णी झाली होती. या विधान परिषद निवडणुकीत धनंजय मुंडेंनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. भाजपने धस यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी मोठी ताकद लावली होती.  त्यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे हा पराभव धनंजय मुंडेंचा असल्याचे मानले जात आहे.

Web Title: BJP Candidate Suresh Dhas Win In Beed Legislative Council Election