अंबाजोगाईत भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

अंबाजोगाई शहरातील परळी वेस येथे झालेल्या भांडणात विजय जोगदंड यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई नगर पालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४, रा. परळी वेस, अंबाजोगाई) यांचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १८) रात्री घडली.  

अंबाजोगाई शहरातील परळी वेस येथे झालेल्या भांडणात विजय जोगदंड यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वरिष्ठ पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Web Title: BJP corporater vijay jogdand murder in Ambajogai