
चक्क अधिकाऱ्यांना वाईनच्या बाटल्या भाजपने भेट दिल्या, परभणीत प्रशासन अचंबित
परभणी : राज्य शासनाने सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर त्याचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. परभणी (Parbhani) येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने वाईन विक्रीला विरोध दर्शवित जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांना सोमवारी (ता.३१) सकाळी निषेधाच्या निवेदनासह वाईनच्या बाटल्या भेट स्वरुपात देऊन या निर्णयाचा विरोध दर्शविला. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाने राज्यातील सुपर मार्केटमधून वाईन विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरात वादाला तोंड फुटले आहे. सत्तेतील महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) घटक पक्षांच्या नेत्यांनी या निर्णयाला समर्थन केले असले तरी विरोधी पक्ष भाजपने मात्र या निर्णयाविरोधात राज्यभर रान उठविले आहे. भाजपने (BJP) या निर्णयाला विरोध करत हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी लावून धरली आहे. (BJP Distribute Wine Bottles To Officers In Parbhani)
हेही वाचा: औरंगाबादेत वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात; चार जण ठार, ३० जखमी
सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करत भाजपने राज्यभरात आंदोलने सुरु केली आहेत. परभणी येथे ही सोमवारी राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करून प्रशासनास निषेधाचे निवेदन देण्यात आले. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन हे तेथील बड्या अधिकाऱ्यांना वाईनच्या बाटल्या वाटप केल्या. सकाळीच कार्यालयात भाजपने केलेल्या या अनोख्या आंदोलनामुळे प्रशाकीय अधिकारी मात्र अंचबित झाले. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना निषेधाच्या निवेदनासोबत भाजप पदाधिकाऱ्यांनी वाईनच्या बाटल्या भेट दिल्या.
हेही वाचा: Aurangabad : औरंगाबादेत कोरोनाबाधित पाच महिन्यांच्या मुलाचा मृत्यू
सरकारला शरम वाटली पाहिजे
ज्या दुकानात आपल्या कुटूंबातील महिला, मुले किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी जातात. त्याच दुकानातून वाईन विक्री होत असेल तर ही खेदाची गोष्ट आहे. राज्य सरकारला याची शरम वाटली पाहिजे. हा निर्णय गलिच्छ आहे. याचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी व्यक्त केली आहे.
Web Title: Bjp Distribute Wine Bottles To Officers In Parbhani
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..