
औरंगाबादेत वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात; चार जण ठार, ३० जखमी
मोबीन खान | सकाळ वृत्तसेवा
वैजापूर : वऱ्हाडाच्या गाडीला अपघात होऊन चार जण जागीच ठार झाले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात २५ ते ३० लोक जखमी झाल्याची घटना वैजापूर (Vaijapur) तालुक्यातील शिवराई गावाजवळ सोमवारी (ता. ३१) पहाटेच्या सुमारास घडली.कविता बाबासाहेब वडमारे (वय ४५), प्रज्ञा गौतम गायकवाड (१७), दीपक वर्हाळे (८), ललिता पवार (४८, सर्व रा.अंबड जि.नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जखमींना घाटी व वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Aurangabad News)
हेही वाचा: धक्कादायक! अल्पवयीन मुलाने ४ जणांना कारने चिरडलं
या घटनेविषयी अधिक माहिती, आयशरमधून लग्नाचं वऱ्हाड मंठाहुन नाशिककडे निघाले होते. आयशरमध्ये एकूण ३५ लोकं होती. वऱ्हाडाची गाडी शिवराई गावाजवळ येताच समोरून येणाऱ्या ट्रकचा आणि आयशरचा अपघात झाला. ज्यात वऱ्हाडमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जणाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. तसेच यातील २५ ते ३० जण जखमी असून, त्यांच्यावर वैजापूर आणि औरंगाबाद शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस अधीक्षक व वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच वैजापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यातील किरकोळ जखमी रुग्णांवर वैजापूर (Vaijapur) येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, गंभीर जखमी रुग्णांना औरंगाबाद येथील घाटीत हलवण्यात आले आहे.
हेही वाचा: महाविकास आघाडीबाबत निर्णय स्थानिकांकडे ; उदय सामंत
Web Title: Accident News Aurangabad Nashik Lasur Road 4 People Dead
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..