Umarga News : भाजपला सुसंस्कृत नेता मिळाला; आमदार अभिमन्यू पवार यांनी माजी मंत्री बसवराज पाटील यांचे केले कौतुक

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री बसवराज पाटील भाजपवासीय झाल्यानंतर राजकारणातील एकमेकांचे विरोधकांचे मनोमिलन झाले आहे. ​
BJP got best leader MLA Abhimanyu Pawar praised former minister Basavaraj Patil
BJP got best leader MLA Abhimanyu Pawar praised former minister Basavaraj PatilSakal

उमरगा : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री बसवराज पाटील भाजपवासीय झाल्यानंतर राजकारणातील एकमेकांचे विरोधकांचे मनोमिलन झाले आहे. औश्याचे भाजपाचे आमदार अभिमन्यु पवार यांनी शनिवारी (ता. दोन) शंभर वहानांचा ताफा घेऊन मुरुम (ता. उमरगा) येथे निवासस्थानी माजी मंत्री बसवराज पाटील यांचा सत्कार केला.

या वेळी आमदार पवार यांनी मंत्री पाटील यांच्यावर स्तुतीसुमने उधळली, ते म्हणाले, ४० वर्षांच्या राजकीय कालखंडात श्री. पाटील यांनी विविध पदांच्या माध्यमातून जनसेवा केली आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात औसा तालुक्यात आमदार म्हणून काम करताना वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन घेतले आहे.

बसवराज पाटील यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाला एक सुसंस्कृत नेता मिळाला असल्याने आपल्याला आनंद झाला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत बसवराज पाटील माझे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. निवडणुकीत आम्ही दोघेही वैयक्तिक पातळीवर टीका केली नाही.

बसवराज पाटील यांनी दहा वर्षांच्या काळात केलेली विकास कामाचे मुद्दे मांडले तर मी माझी भूमिका सांगितली. बसवराज पाटील यांनी राजकीय आयुष्यात सभ्यता आणि सुसंस्कृतपणा जपला आहे. मी आमदार झाल्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी विकास कामांसाठी मार्गदर्शन घेतले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे यापुढच्या कालखंडात एक लहान भाऊ म्हणून त्यांचे मार्गदर्शन मिळणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

या वेळी धाराशिव जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, युवा नेते शरण पाटील, अँड परीक्षित पवार, सुभाष जाधव, संतोष मुक्ता, बसवराज धाराशिवे, संगमेश्वर ठेसे, दिलीप भालेराव, प्रकाश अष्टे, शेखर सोनवणे, किरण उटगे, युवराज बिराजदार, ज्ञानेश्वर वाकडे, मदन पाटील, दत्ता चटगे आदींची उपस्थिती होती. या वेळी मंत्री पाटील यांनीही आमदार पवार यांचे कौतूक केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.

माजी मंत्री पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कामाचे केले कौतूक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार उत्तम काम करत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार पवार व मी एकमेकांविरोधात लढलो असलो तरी आज एकाच कुटुंबाचा भाग आहोत. दोन टर्म निवडून दिल्याने औसा मतदारसंघातील जनतेचा कायम ऋणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com