माजी खासदार शिवाजी माने यांच्या प्रवेशाने हिंगोलीत भाजपला अच्छे दिन

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
 शिवाजी माने
शिवाजी मानेsakal

हिंगोली: हिंगोली लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार अँड. शिवाजी माने यांनी सोमवारी ता.२५ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपाचे कमळ हाती घेतल्याने भाजपला अच्छे दिन आले आहेत. माजी खासदार शिवाजी माने यांना भाजप मध्ये प्रवेश देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर , प्रसाद लाड, नितेश राणे, हिंगोली जिल्हा अध्यक्ष रामराव वडकूते, हिंगोली विधानसभा आमदार तान्हाजी मुटकुळे, मिलिंद यंबल व भाजपा पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा मागील अनेक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. या चर्चेला सोमवारी पुर्ण विराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात अधिकृतपणे त्यांचा प्रवेश झाला आहे.

दरम्यान शिवाजी माने हे १९९६ मध्ये शिवसेनेकडून हिंगोली लोकसभा मतदार संघात निवडून आले होते. १९९८ मध्ये परत लोकसभा निवडणूक झाली यामध्ये त्यांचा पराभव झाला. नंतर १९९९ च्या निवडणुकीत ते परत शिवसेने कडून निवडून आले होते. २००४ च्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान शिवाजी माने यांनी कळमनुरी मतदार संघात दोन वेळा विधानसभा निवडणूक लढविली होती.

मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर हिंगोली जिल्हा काँग्रेस कमीटीचे ते काही काळ अध्यक्ष देखील होते. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. नंतर भाजपात प्रवेश केला. यानंतर त्यांनी शिवसेनेत परत प्रवेश केला. तर आता पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेतल्याने भाजपची ताकद वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com