आरोग्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर जाणाऱ्या भाजपचा मोर्चा रोखला | Jalna News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP March In Jalna
आरोग्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर जाणाऱ्या भाजपचा मोर्चा रोखला | Jalna News

आरोग्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर जाणाऱ्या भाजपचा मोर्चा रोखला

जालना : बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी व भोकरदनमधील राजूर मंडळातील गावांना अतिवृष्टी अनुदानापासून वगळल्याने भाजपच्या (BJP) वतीने शुक्रवारी (ता.१२) ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या निवासस्थानावर हा मार्चा जात असताना पोलिस प्रशासनाने अंबड चौफुली येथे रोखला. या मोर्चात भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्यासह भाजप (Jalna) पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते. जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने खरीप पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई दिली. मात्र, बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी व भोकरदन तालुक्यातील राजूर मंडळातील गावांना अतिवृष्टी अनुदानापासून वगळल्याचा आरोप करत भाजपने शुक्रवारी शेकडो ट्रॅक्टरसह आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला.

हेही वाचा: Fixed Deposit वर मिळवा जबरदस्त रिर्टन, 'या' पाच बँकांचा करा विचार

या मोर्चाला छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथे सुरवात झाली. भाजपचा ट्रॅक्टर मोर्चा हा तहसीलदार कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गेपालकमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानी निघाला होता. मात्र, पोलिस प्रशासनाने भाजपचा हा ट्रॅक्टर मोर्चा अंबड चौफुली येथे अडविला. त्यामुळे या मोर्चाचे अंबड चौफुली येथे सभेमध्ये रूपांतर झाले. दरम्यान यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

loading image
go to top