जालना : अनधिकृत पुतळाप्रकरणी भाजप आमदारासह 44 जण ताब्यात

sa.jpg
sa.jpg

अंबड  : अंबड (जालना)  येथील जालना बीड महामार्गावरील पाचोड नाक्यावर शुक्रवारी (ता.13) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविल्याप्रकरणी भाजप आमदार नारायण कुचे यांच्यासह 44 जणांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

शुक्रवारी पहाटे अंबड पोलिसांची  रात्रगस्त सुरू असताना पाचोड नाका येथे छात्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर  पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी भेट देऊन या संदर्भातील माहिती वरिष्ठांना दिली.  त्यानंतर घटनास्थळावरून भाजप आमदार नारायण कुचे, अंबादास आंभोरे, बाबासाहेब इंगळे, दीपक ठाकूर, सौरभ कुलकर्णी, मुरलीधर चौधरी, हनुमान धांडे, नरेश बुंदेलखंडी, देविदास कुचे यांच्यासह 44 जणांना ताब्यात घेतले.

तसेच त्यांच्या विरोधात 143, 149, 188, 447 भादवीसह कलम 135 बि.पि.ॲक्ट सह कलम 11 महाराष्ट्र राज्य पुतळयाचा पावित्र्य भंग प्रतिबंध अधिनियम प्रमाणे अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बलैय्या हे करीत आहेत. दरम्यान, यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी राजे की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com