शेगावच्या मंदिर विरोधी आंदोलनामागे भाजपा आमदार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

खामगाव - श्री संत गजानन महाराज संस्थान विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे मास्टर माईंड भाजपचे आमदार असल्याचा आरोप माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केला आहे. दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, शेगाव येथील श्री संत गजानन संस्थान महाराष्ट्रातच नाही तर देशात सेवा, शिस्त आणि पारदर्शक कारभार याकरिता ओळखले जाते. परंतु, आता भाजपाची सत्ता आल्यावर विकास आराखडा भ्रष्टाचाराचे कुरण बनला आहे असा आरोपही सानंदा यांनी केला.

शेगावात भाजपा आमदार द्वेषाचे राजकारण करत आहेत. विशेष म्हणजे मंदिर विरोधी आंदोलनास बळ देण्याचे काम भाजपाचे आमदार करत असल्याचेही त्यांनी म्हटले. शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थान सारख्या समाजपयोगी कार्य करणाऱ्या संस्थेच्या विरोधात भापजाचे आमदार कटकारस्थान करत आहेत. त्यामुळे लाखो भक्त नाराज झाले असून, त्यांच्या संतापाचा केव्हा उद्रेक होईल हे सांगता येत नाही असेही त्यांनी सांगितले. 

देवा धर्माच्या नावावर मतांचा जोगवा मागणारे भाजपावले आता एका आदर्श देवस्थानला वेठीस धरत असून, श्री संत गजानन महाराज त्यांना माफ करणार नाही, आगामी निवडणुकीत त्यांची सत्तेची मस्ती उतरेल असेही दिलीपकुमार सानंदा म्हणाले.

Web Title: BJP MLA behind Shegaon temple protest