पंकजा मुंडेंच्या घरासमोर राडा, परळीत धरपकड

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 February 2020

परळी वैजनाथ येथील पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी मनसेच्या शेतकरी संघटना व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी (ता. 17) राडा झाला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे. 

परळी वैजनाथ (जि. बीड) - राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व पन्नगेश्‍वर साखर कारखान्याच्या अध्यक्ष प्रज्ञा मुंडे यांच्या यशश्री निवासस्थानी भाजप व मनसे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आंदोलनावरून सोमवारी (ता. 17) हाणामारी झाली. 

पन्नगेश्‍वर साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या थकीत ऊसबिलासाठी कारखान्याच्या अध्यक्ष प्रज्ञा मुंडे व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानासमोर सोमवारी मनसे शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

आंदोलनास पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली होती; पण मनसे आंदोलनावर ठाम होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलनकर्ते व भाजप कार्यकर्ते याच कारणावरून एकमेकांना भिडले. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील प्रसंग टळला. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP-MNS activists in front of Pankaja Munde's house