Video : रावसाहेब दानवे म्हणतात, मी असेपर्यंत सर्रास करा गोहत्या; व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

केंद्र सरकारकडून गोहत्या बंदी कायद्याची देशभरात जोरदार अंमलबजावणी होत असताना त्यांचेच केंद्रीय मंत्री असे बोलताना दिसत आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एका प्रचारात असे ते बोलले आहेत.

भोकरदन : नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले जालन्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रावसाहेब दानवे यांचे प्रचारसभेतील एक भाषण व्हायरल झाले आहे. या भाषणात ते मी असेपर्यंत सर्रास गोहत्या करा असे बोलताना दिसत आहेत.

केंद्र सरकारकडून गोहत्या बंदी कायद्याची देशभरात जोरदार अंमलबजावणी होत असताना त्यांचेच केंद्रीय मंत्री असे बोलताना दिसत आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एका प्रचारात असे ते बोलले आहेत. दानवे यापूर्वी शेतकऱ्यांना साले असे संबोधिले होते.

रावसाहेब दानवे यांच्याकडून या व्हिडिओवर खुलासा करण्यात आला असून, गो-हत्येबद्दल मी कोणतेही विधान केलेले नसून या व्हिडिओमध्ये छेडछाड करून खोडसाळ वृत्तीतून समाज माध्यमामध्ये चुकीचा संदेश पसरविण्यात येत असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.

रावसाहेब दानवे यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ

दानवे यांनी व्हिडिओत म्हटले आहे, की दोन रुपये किलो गहू, तीन रुपये तांदूळ मी देतो. कारण, केंद्रात माझ्याकडे अन्नपुरवठा मंत्रालय माझ्याकडे आहे. या जिल्ह्यात सर्वांत जास्त अवैध धंदे चालतात. चंदन चोरी, तांदुळाचा गैरव्यवहार होतो. मी सगळे एका दिवसात बंद करेन. जेव्हा पहिल्यांदा गोहत्या बंद झाली, तेव्हा बकरी ईद आली. त्यावेळी माझ्याकडे मागणी करण्यात आली गोहत्या बंद करण्यात आली. तेव्हा मी त्यांना सांगितले होते जोपर्यंत रावसाहेब दानवे आहे, तोपर्यंत गोहत्या बंद होणार नाही.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP Raosaheb Danve viral video on cow slaughter