खासदार निंबाळकरांवर हल्ला करणारा निघाला भाजपचा कार्यकर्ता

वृत्तसंस्था
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

- अजिंक्य टेकाळे हा भाजप आयटी सेलचा प्रमुख

उस्मानाबाद : शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका तरूणाने हल्ला केला. या हल्लेखोराने निंबाळकर यांच्या उजव्या हातात हात दिल्यानंतर हल्ला केला. आता या हल्लेखोराची ओळख पटली असून, तो भाजप कार्यकर्ता असल्याची माहिती मिळत आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका युवकाने आज (बुधवाऱ) सकाळी चाकूहल्ला झाला. या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी येथे शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी निंबाळकर गेले होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या अजिंक्य टेकाळे या युवकाने त्यांच्यावर चाकूहल्ला केला. त्याने चाकू लपवून त्यांच्यावर हल्ला केला. हातातील घडाळ्यामुळे ते थोडक्यात बचावले आहेत. अजिंक्य टेकाळे हा भाजप आयटी सेलचा प्रमुख असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या हल्ल्यामागील नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP party worker who attacked Omprakash Rajenimbalkar