लोकसभेच्या निवडणूका भाजपा-शिवसेनेने एकत्र लढवाव्यात - रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

राज्यातील येणाऱ्या २०१९ च्या लोकसभा निवडणूका भाजपा व शिवसेनेने एकत्र लढविल्या तर पुन्हा युतीची सत्ता येणार असे भाकीत केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी नांदेडमध्ये वर्तवले. म्हणून लोकसभेच्या निवडणुका भाजप आणि शिवशेनेने एकत्र लढवायला हव्यात. जर युती झाली नाही तर याचा जास्त फटका शिवसेनेला बसणार असेही मत आठवले यांनी व्यक्त केले. 

नांदेड - राज्यातील येणाऱ्या २०१९ च्या लोकसभा निवडणूका भाजपा व शिवसेनेने एकत्र लढविल्या तर पुन्हा युतीची सत्ता येणार असे भाकीत केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी नांदेडमध्ये वर्तवले. म्हणून लोकसभेच्या निवडणुका भाजप आणि शिवशेनेने एकत्र लढवायला हव्यात. जर युती झाली नाही तर याचा जास्त फटका शिवसेनेला बसणार असेही मत आठवले यांनी व्यक्त केले. 

केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बुधवारी (ता. सहा) नांदेड दौऱ्यावर आले असता शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी मोदी सरकारच्या चार वर्षाच्या कामाची स्तुतीही यावेळी केली. 

Web Title: BJP-Shiv Sena should fight together for Lok Sabha 2019 elections says ramdas athavale