Hingoli : हिंगोलीत अवैध धंद्यांविरोधात भाजपचे आमरण उपोषण आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli
Hingoli : हिंगोलीत अवैध धंद्यांविरोधात भाजपचे आमरण उपोषण आंदोलन

Hingoli : हिंगोलीत अवैध धंद्यांविरोधात भाजपचे आमरण उपोषण आंदोलन

हिंगोली : जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यासंदर्भात भाजपच्या वतीने गुरुवारी (ता.१८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून अवैध धंदे जोमाने सुरू आहेत. यामध्ये रेती, गुटखा, ऑनलाईन मटका, क्लब, दारू हे राजरोसपणे सुरू आहे. हे धंदे बंद करावेत या संदर्भात आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते. हे व्यवसाय बंद न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी या सर्व अवैध धंद्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालया (BJP) समोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा: दीड वर्षाच्या चिमुकल्याची आईसाठी आक्रोश, अनेकांनी व्यक्त केली हळहळ

या उपोषणास आमदार तान्हाजी मुटकुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार रामराव वडकुते, माजी आमदार गजानन घुगे, हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, लोकसभा संघटक विनायक भिसे पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पु चव्हाण, मिलिंद यंबल, तालुकाध्यक्ष संतोष टेकाळे यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा समावेश आहे.

loading image
go to top