'राज्यात सर्वाधिक संख्येने येईल भाजपची सत्ता '

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

घनसावंगी - नगरपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व "राष्ट्रवादी'ने सर्वाधिक संख्येनी नगरपरिषदा ताब्यात येतील, असा दावा केला होता; मात्र भाजप या निवडणुकीत क्रमांक एकवर राहिला. आता तीच पुनरावृत्ती करीत राज्यात सर्वाधिक संख्येनी जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता येईल, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. रविवारी (ता.12) घनसावंगी तालुक्‍यातील गुरुपिंपरी येथे ते बोलत होते. 

जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सुजाता कोल्हे, गणाच्या उमेदवार सोनाली गोरे, मंगुजळगाव गणाच्या उमेदवार लता बोरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. खासदार दानवे पुढे म्हणाले, की कॉंग्रेस व "राष्ट्रवादी'च्या काळात ब्रिटिश काळापासून सुरू असलेली पीक आणेवारी पद्धत भाजपने सरकार आल्यानंतर बंद केली. पूर्वी दुष्काळात पन्नास टक्के नुकसान असेल तर नुकसानभरपाई मिळायची. आता आम्ही 33 टक्के नुकसानीनंतर भरपाई दीड पट देण्याचा निर्णय घेतला. एकाही शेतकऱ्याला एक हजार रुपयांपेक्षा कमी धनादेश दिला नाही. 

राहुल व सोनिया गांधी यांना शेतीचे प्रश्‍न कळत नसताना कृषिप्रधान देशात साठ वर्षे कॉंग्रेसच्या हातात सत्ता दिली. अशोक चव्हाण यांनाही शेतीचे ज्ञान नसल्याचे त्यांनी सांगितले. मागील सरकारने सत्तर हजार कोटी सिंचनावर खर्च केला; मात्र केवळ एक टक्का सिंचन झाले. त्यामुळे हा पैसा कुठे गेला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सर्व योजना एकत्रित आणून राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. या योजनेमुळे मागील वर्षी 1400 कोटींत 24 टीएमसी पाणी वाचविले. यासाठी एकाही शेतकऱ्याची जमीन गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार विलासराव खरात, किरण खरात, विश्वजित खरात, आयेशा खान, सुभाष देंडगे, गीतांजली वाघ, लक्ष्मीबाई भुतडा, कैलास शेळके आदींची या वेळी उपस्थिती होती. सूत्रसंचालन सरचिटणीस देवीदास देशमुख यांनी, तर प्रास्ताविक गोविंद ढेंबरे यांनी केले. आभार विष्णू जाधव यांनी मानले.

Web Title: BJP will come to power in the state's most popular