पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यासाठी भाजपचे हिंगोलीत निदर्शने | BJP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Agitation In Hingoli
पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यासाठी भाजपचे हिंगोलीत निदर्शने

पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यासाठी भाजपचे हिंगोलीत निदर्शने

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : केंद्र शासनाने पेट्रोल व डिझेलवरील करांमध्ये कपात केल्यामुळे दोन्हीचे भाव काही प्रमाणात कमी झाले आहेत. मात्र राज्य सरकारने कर कमी केला नसल्याने त्याचा आर्थिक फटका सर्वांना बसत असल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी (ता.११) गांधी चौकात निदर्शने करण्यात आली. पेट्रोल व डिझेलचे भाव वाढल्यामुळे काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीने (Petrol Diesel Prices Hike) केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, केंद्र शासनाने आपल्या करांमध्ये कपात केल्यानंतर काही प्रमाणात भाव कमी झाले आहेत. देशातील इतर अनेक राज्यांमध्ये स्थानिक कर कमी करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना (BJP) पेट्रोल व डिझेल स्वस्तात मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील पेट्रोल व डिझेल वरील कर अद्यापही कमी न केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना (Hingoli) आर्थिक झळ सहन करून पेट्रोल-डिझेल खरेदी करावे लागत आहे.

हेही वाचा: 'जर प्रसिद्धी मिळाली, तर सोनू सूद बना कंगना नाही'

यावर आक्रमक झालेल्या भाजपच्या वतीने गुरुवारी गांधी चौक येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, माजी आमदार गजानन घुगे, नगराध्यक्ष बांगर , फुलाजी शिंदे , मिलिंद यंबल , पप्पू चव्हाण , संतोष टेकाळे , राजू यादव , बंटी राठोड, अमोल जाधव, शाम खंडेलवाल, संजय ढोके, कृष्णा ढोके, करण भंसाळी, सचिन शिंदे, उमेश नागरे, राजु यादव, बंटी राठोड, यशोदा कोरडे, सुनंदा मिश्रा, रजनी पाटील आदीची उपस्थिती होती.

loading image
go to top