अंबड शहरात भाजपचे घंटानाद आंदोलन, कार्यकर्त्यांनी दिल्या विविध घोषणा

बाबासाहेब गोंटे
Saturday, 29 August 2020

केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली अंबड तालुका भारतीय जनता पार्टीचे दार उघड उद्धवा दार उघड, दारू नको भक्तीचे दार उघड, अशा घोषणा देत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

अंबड  (जि.जालना) : केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली अंबड तालुका भारतीय जनता पार्टीचे दार उघड उद्धवा दार उघड, दारू नको भक्तीचे दार उघड, अशा घोषणा देत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

सामाजिक अंतर आणि नियमासह राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरु करून भजन, किर्तन व पुजा करण्यास परवानगी द्यावी.यासाठी भाजपा अंबड तालुक्याच्या वतीने अंबडचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा - राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्यांच्या 'समाधी' अफवेला पूर्णविराम; दोन...

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष दीपकसिंह ठाकूर, तालुकाध्यक्ष जितेंद्र पालकर, गटनेते अरुण उपाध्ये, देविदास कुचे, संजय जैस्वाल,पावसे, कृष्णा गायके, डॉ. नंदकिशोर पिंगळे, रमेश शहाणे, सौरभ कुलकर्णी, बाळासाहेब तायडे, साईनाथ उकिर्डे, फेरोज शेख, बाळू शाहने, धर्मा बाबर, द्वारकादास जाधव, संजय राठोड, बाळू खरात, सुहास सोडानी, राजू तारे, राजेश सावंत, बाबुराव खरात, कृष्णाभाऊ खरात, संदीप आंधळे, रमेश बुन्देलखंडे, सत्यभान  खरात, लक्ष्मण पेदे, सुनील बिडे, नरेश बुन्देलखंडे, कुवर सिह ठाकूर, राहुल मुंजाळ, दारासिंग मुऱ्हाडे,  नारायण नागलोत, सचिन राठोड, प्रकाश शेळके, संदीप गीतखाने, जनार्धन सोळुंके, रावसाहेब बिडकर, बंडू साळुंके, यशवंत मुजगुले, लक्ष्मण राक्षे, याकुब पठाण, शाम सावंत, लक्ष्मण पडळकर, बालाजी झांबरे यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी, वारकरी उपस्थित होते.

 

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's Ghantanand Agitation In Ambad