वैजापुरच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या शिल्पा परेदशी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

नगराध्यक्ष भाजपचा विजयी झालेला असला तरी 23 संख्याबळ असलेल्या नगरपालिकेत शिवसेनेने 13 जागांवर विजय मिळवुन बहुमत मिळविले.

वैजापुर - औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुर नगरपालिकेच्या निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपात गेलेले दिनेश परदेशी यांच्या पत्नी शिल्पा परदेशी  2 हजार 73 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या सय्यद तशफा यांचा पराभव केला. नगराध्यक्ष भाजपचा विजयी झालेला असला तरी 23 संख्याबळ असलेल्या नगरपालिकेत शिवसेनेने 13 जागांवर विजय मिळवुन बहुमत मिळविले. मात्र नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभुत झाल्याने बहुमत असून ही शिवसेनेच्या आनंदावर विरजन पडले. 

नगरपरिषदेत भाजपचे कमळ फुलणार की शिवसेनेचा भगवा फडकणार यांची उत्सूकता शिगेला पोचली होती. पंधरा वर्ष वैजापूर नगरपालिकेवर सत्ता गाजवणारे तत्कालीन काँग्रेसचे नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे निवडणुकीतील राजकारणाला अचानक कलाटणी मिळाली होती. परदेशी यांच्या पक्षबदलाने घायाळ झालेल्या काँग्रेस ऐनवेळी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. त्यांनी फक्त जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे याचे पुतणे उल्हास उर्फ विजय ठोंबरे यांना नगरसेवक पदासाठी मैदानात उतरविले होते ते विजय झाले. तर प्रभाग क्रमांक सात हा माजी आमदार आर. एम. वाणी याचा बालेकिल्ला मात्र या प्रभागातून त्याचे पुत्र सचिन रंगनाथ वाणी यांना पराभव पत्करावा लागला असुन एक साधारण कार्यकर्ता शैलेश चव्हाण येथून विजयी झाल्याने हा पराभव सेनेच्या जिव्हारी लागला आहे. तर नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष संदिप टेके यांच्या पत्नी नगरसेवक पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: BJPs Shilpa Paribarthi as the citys president