व्हिडिओ शूटिंगद्वारे ब्लॅकमेल केल्याने व्यावसायिकाची आत्महत्या

Video-Shooting
Video-Shooting

औरंगाबाद - व्यावसायिकाला पैशांसाठी ब्लॅकमेल करत आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात दोन महिला आरोपींना रविवारी (ता. पाच) पोलिसांनी अटक केली. वृंदावणी ऊर्फ संगीता गिराम व गंगू ऊर्फ गंगा गिराम अशी त्या दोन महिला आरोपींची नावे आहेत.

प्रकरणात मृत कृष्णा जोशी यांची पत्नी अर्चना जोशी (४५, रा. न्यू हनुमाननगर) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, कृष्णा जोशी चालवत असलेल्या दुकानात आप्पासाहेब गिराम व त्याच्या कुटुंबाचे नेहमी येणे-जाणे सुरू होते. आप्पासाहेब गिरामने पत्नी व मुलीच्या मदतीने जोशींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याआधारे गिराम कुटुंबाने त्यांना ब्लॅकमेल करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊ लागले. त्यातून जोशी यांनी दागिने, पैसे तसेच प्लॉटही नावे केला. तरीदेखील गिराम कुटुंबीय त्यांचा पैशासाठी छळ करत होते. 

सात एप्रिल रोजी पहाटे कृष्णा यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना १८ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्युपूर्वी जोशी यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी हस्तगत केली. प्रकरणात पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बुधवारपर्यंत कोठडी
पोलिसांनी वृंदावणी (३६) व तिची मुलगी गंगू ऊर्फ गंगा (२०, दोघी रा. शिवशंकर कॉलनी) या दोघींना अटक करून सोमवारी (ता. सहा) न्यायालयात हजर करण्यात आले असता बुधवारपर्यंत (ता. ८) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले. प्रकरणात सहायक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com