अंध बांधवांना मिळेल सुयोग्य जोडीदार

marriage
marriage

औरंगाबाद : गेल्या काही वर्षांपासून वधू-वर सूचक केंद्राचे पेवच फुटले आहे. अनेकजण आपल्या-जाती-धर्माच्या पलीकडे विचारही करीत नाहीत. मात्र, शहरात जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ अंधांसाठी वधू-वर सूचक केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यासाठी तारामती बाफना अंध विद्यालयाने पुढाकार घेतला आहे. 

या विद्यालयातर्फे अंध मुलांना शिक्षण, प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले जाते. सध्या विद्यालयात अगरबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. अनेक अंध विद्यार्थी येथे शिक्षण घेऊन चांगल्या पदावर नोकरी करीत आहेत. चांगली नोकरी असली, तरी त्यांचे संसाराचे स्वप्न अपूर्ण राहते. त्यामुळे तारामती बाफना विद्यालयाने शुक्रवारपासून (ता. 4) अंधांसाठी वधू-वर सूचक केंद्र सुरू केले आहे. केंद्रात अंध मुला-मुलींची मोफत नोंदणी केली जाणार असून, त्यांच्या इच्छेनुसार अनुरूप स्थळ मिळताच त्यांचे लग्नाचे स्वप्न पूर्ण केले जाणार आहे. दरवर्षी वधू-वर मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. चार जानेवारीला ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने वधू-वर सूचक केंद्र सुरू करण्यात आले. इच्छुक मुला-मुलींची व पालकांची सहमती घेऊन त्यांचे समुपदेशन करून पुढील काम करणार असल्याचे मुख्याध्यापक कैलाश निकम यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

साठ विद्यार्थ्यांना शिक्षण 
विद्यालयात पहिली ते आठवीपर्यंतच्या अंध विद्यार्थांना शिक्षण दिले जाते. त्यानंतर पुढील म्हणजेच आठवी ते दहावीचे शिक्षण घेण्यासाठी हे विद्यार्थी न्यू हायस्कूल हर्सूल या ठिकाणी जातात. त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. 

अंध मुलांना लग्नासाठी अनेक अडचणी येतात. त्यामुळे हा उपक्रम राबविला जात आहे. या ठिकाणी निश्‍चितच फायदा होईल. महाराष्ट्रभरातून प्रतिसाद मिळेल. 
- कैलास बाफना, खजिनदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com