
रांजणी (ता.घनसावंगी) येथील अय्याजखां फय्याजखां पठाण (वय 27 वर्षे) हा सोमवार (ता.१४) दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरातून कोणाला काही न सांगता अचानक निघून गेला. सोमवारी घरातून गेलेला अय्याज पठाण मंगळवारी सकाळपर्यंत घरी परतला नाही.
घनसावंगी (जालना) : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील 27 वर्षीय युवक कुणालाही न सांगता सोमवारी (ता.१४) घरातून निघून गेला होता. अखेर युवकाचा मृतदेह चौथ्या दिवशी गुरुवारी (ता.१७) रांजणीवाडी शिवारात आढळल्याने या घटनेबद्दल सर्वञ हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घनसावंगी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
हे ही वाचा : आधी लग्न आणि मग साखरपुडा ; अशीच सरपंचपदाच्या आरक्षणाची तऱ्हा !
रांजणी (ता.घनसावंगी) येथील अय्याजखां फय्याजखां पठाण (वय 27 वर्षे) हा सोमवार (ता.१४) दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरातून कोणाला काही न सांगता अचानक निघून गेला. सोमवारी घरातून गेलेला अय्याज पठाण मंगळवारी सकाळपर्यंत घरी परतला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. त्यांच्या नातेवाईकानीं जालना, औरंगाबाद, परभणी जिल्ह्यातील नातेवाईकाकडे त्याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. दरम्यान त्याचे वडील फैय्याज खा दौलतखा पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार घनसावंगी पोलिस ठाण्यात सदरील युवक हरवल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र गुरुवारी (ता.१७) दुपारी राजंणीवाडी शिवारातील दुधना नदीकाठच्या जवळ एका अनोळखी युवकाचे प्रेत तरंगत असल्याची माहिती राजंणीवाडीचे पोलिस पाटील देवराव भाऊराव कोकाटे यांनी घनसावंगी पोलिस ठाण्यात कळविल्यानंतर पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्यासह पोलिस जमादार रामचंद्र खडसे, विनोद देशमाने, भागवत खरात, नारायण घोडके यांनी घटनास्थळी पोहोचले.
हे ही वाचा : पोलिसाच्या हुशारीमुळे तीन दुकाने व घर फोडण्याचा प्रयत्न फसला
यावेळी युवकाचा मृतदेह अय्याज पठाण यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी मग बघ्यांची मोठी गर्दी झाली. मृतकाच्या घटनास्थळी पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले. विहिरीतून प्रेत काढण्यासाठी राजंणी येथील लोकांनी सहकार्य केले. मृत युवकाच्या शवविच्छेदन करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नागेश सावरगावकर, राजंणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल ठाकूर, रामजीवन शर्मा आदींनी पुढाकार घेतला. या प्रकरणी पोलिस पाटील देवराव कोकाटे यांच्या माहितीनुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस जमादार रामचंद्र खलसे हे करत आहेत. मार्गदर्शनाखाली पुढील तपास जमादार रामचंद्र खलसे हे करीत आहेत.
संपादन - सुस्मिता वडतिले