आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याची चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - बोगस अपघात विमा प्रकरणात डॉक्‍टर, वकील व एजंटाच्या अटकसत्रानंतर आता यात पोलिस दलातील दुसऱ्या एका कर्मचाऱ्याची चौकशी सुरू झाली. सोमवारी (ता. 27) चौकशीसाठी कागदपत्रांसह पोलिस आयुक्तालयात त्याला बोलावण्यात आले होते. 

अपघात झाल्याचे दाखवून खोटी एमएलसी व बोगस पंचनामा करून विम्यासाठी न्यायालयात दावे दाखल करणारे रॅकेट तीन फेब्रुवारीला उघड झाले. महेश मोहरीर, जमादार आर. आर. शेख, विमा एजंट शेख लतीफ शेख अब्दुल तसेच गजानन मापारी यांना पोलिसांनी अटक केली. यानंतर आता एका कर्मचाऱ्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. अपघातानंतर केलेला पंचनामा, त्यातील घेतलेल्या जखमींचे जबाब याआधारे तयार केलेली कागदपत्रे तसेच न्यायालयात दाखल झालेली कागदपत्रे यात तफावत आहे का?, कागदपत्रांत खाडाखोड झाली का? याची पडताळणी केली जाणार आहे. तसेच ज्या जखमींचे जबाब घेतले, त्यांची आताची स्थिती काय?, जखमी खरे आहेत काय याबाबत पडताळणी केली जाणार आहे. काही काळेबेरे आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई होऊ शकते, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Web Title: Bogus accident insurance case