भोकरदनमध्ये तोतया परीक्षार्थी पकडला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

भोकरदन (जि. जालना) - डायरेक्‍टर ऑफ म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन विभागातर्फे शुक्रवारी "क' वर्गाच्या कर निर्धारक पदासाठी परीक्षा घेण्यात आल्या. या ऑनलाइन परीक्षेत भोकरदनमधील गणपती शाळेच्या परीक्षा केंद्रावर युवराज प्रेमसिंग नाऱ्हेडे (वय 25) हा तोतया परीक्षार्थी आढळला. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

नाऱ्हेडे हा दुसऱ्याच्या नावे परीक्षा देत होता. पहिल्या सत्रातील ऑनलाइन परीक्षेला 130 विद्यार्थी बसले होते. पर्यवेक्षक रामदास गिरी परीक्षार्थींचे प्रवेशपत्र, ओळखपत्र तपासत असताना आसन क्रमांक 125 वर अनिल देविदास चव्हाण या विद्यार्थ्याचे नाव होते; तर परीक्षा देणाऱ्याचे नाव युवराज नाऱ्हेडे असल्याचे आढळून आले.

Web Title: bogus Examinee arrested crime

टॅग्स