Beed News : बोगस शालार्थ आयडी घोटाळा; बीडच्या शिक्षणाधिकारी किरण कुवर यांचा जामीन अर्ज फेटाळला

किरण कुवर यांच्या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील ११ शिक्षकांच्या बनावट मान्यता व शालार्थ आयडी तयार झाल्याचे आले उघडकीस.
Court

Court

sakal

Updated on

बीड - शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या तब्बल १५० ते १७० कोटी रुपयांच्या बोगस शालार्थ आयडी आणि बनावट वैयक्तिक मान्यतेच्या घोटाळ्यातील संशयित आरोपी, जळगावचे तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी आणि सध्या बीडच्या योजनेच्या शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या किरण जयप्रकाश कुवर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक रोड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. जोशी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com