Kinwat Forest Department: किनवट वन विभागाला हायकोर्टाचा झटका; RTI माहिती न दिल्याप्रकरणी अधिकाऱ्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Maharashtra RTI Act High Court latest order: माहिती आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या किनवट वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला सात वर्षांपासून माहितीच्या शोधात भटकणाऱ्या नागरिकाच्या याचिकेवर हायकोर्टाने मूळ कागदांसह प्रत्यक्ष हजर राहण्याचे कडक निर्देश
Bombay High Court Takes Serious Note of RTI Violation by Kinwat Forest Official

Bombay High Court Takes Serious Note of RTI Violation by Kinwat Forest Official

esakal

Updated on

ईस्लापुर: माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत मागवलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणे आणि राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशाची अवहेलना करणे नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (छत्रपती संभाजीनगर) या बेजबाबदार वर्तनाची गंभीर दखल घेतली आहे. न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी ६ जुलै २०२६ रोजी दिलेल्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण आदेशात, प्रतिवादी क्रमांक चार म्हणजेच जन माहिती अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी किनवट, जिल्हा नांदेड यांना राज्य माहिती आयुक्तांच्या निर्देशानुसार संपूर्ण माहितीसह न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे अन्यथा आदेशाचे पालन नकरण्याचे कारण स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे कडक आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com