'साबिया'ची 'पुस्तक वाचा चळवळ' आता औरंगाबादेतही 

Book reading movement of Sabia now also in Aurangabad
Book reading movement of Sabia now also in Aurangabad

औरंगाबाद : ज्या शाळेत ग्रंथालय नाही. तिथे पुस्तके भेट देतील. तीच पुस्तके विद्यार्थ्यांना वाचून दाखवतील. विद्यार्थ्यांकडूनही वाचून घेतील. पुस्तकातील गोष्टी नाटकात रुपांतरीत केल्या जातील. त्यानंतर विद्यार्थ्यांचे असेसमेंट केले जाईल. तसा आलेखच महिन्यातून एकदा तयार होईल. हे काम कोण करतील? असा प्रश्‍न नक्‍कीच पडला असेल.

तर त्याचे उत्तर आहे; साबियाचे समन्वयक! दिल्ली, मुंबई, पुणे, कोटा या शहरात सुरु असलेली ही अनोखी 'पुस्तक वाचा चळवळ' आता औरंगाबादेतही सुरु होतेय. 

दंतवैद्यक प्रीती आणि अभियंता श्रृष्टी यांच्या कल्पनेतून दोन वर्षापूर्वी 'साबिया'च्या कामाला सुरवात झाली. 'साबिया - शेअर अ बुक इंडिया' असोसिएशनतर्फे ही मोहिम राबविण्यात येत आहे. दिवाळीमध्ये बुक डोनेशन ड्राईव्ह घेतला. त्यातून इंग्रजी मधील 12,500 पुस्तके जमा झाली आहेत. कथा, कादंबऱ्यांचा समावेश आहे. तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम असणार आहे. दोन वर्षात 34 शाळांत उपक्रम सुरु असून 4 हजार मुले-मुली साबियाशी जोडली गेली आहेत. आठवड्यातील शनिवार याकामी समन्वयक राखीव ठेवत आहेत. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचे सदस्यही या मोहिमेत सहभागी होणार आहेत. 

औरंगाबादेत मेहुल दत्ता आणि रविना वरकड यांनी आठवड्यापूर्वी सुरवात केली. 48 समन्वयकांनी गुगल फॉर्म भरले होते. त्यापैकी 16 जणांनी रविवारच्या (ता. 3) बैठकीला हजेरी लावली. बैठकीत एकमेकांची ओळख करुन घेतल्यानंतर जबाबदारी निश्‍चित केली. काम वाटून दिले. समन्वयक शाळेत जाऊन मुख्याध्यापकांची परवानगी घेतील. हे काम आठवडाभर चालणार आहे. समन्वयकांचा व्हॉटसअप ग्रुप तयार केला आहे. त्यावरच कामाची दिशा ठरवत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांना प्राधान्य असेल. खुप कमी वेळात पुढे येत जबाबदारी घेण्यास समन्वयक तयार झाले. साबियात काम करणारे समन्वयक 20 ते 24 वयोगटातील आहेत. यात अभियंता, डॉक्‍टर तर कोणी बीबीएचे शिक्षण घेतोय. नोकरीत राहुनही याकामी मदत करणारी तरुणाई साबियात आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com