अंबाजोगाईत जन्मली मत्स्यपरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

अंबाजोगाई (जि. बीड) - येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील प्रसूती विभागात आज एका महिलेने विचित्र बाळाला जन्म दिला. या बाळाला वैद्यकीय परिभाषेत सिरोनोमेलिया (मत्स्यपरी) असे म्हणतात. या बाळाला अवघे पंधरा मिनिटांचेच आयुष्य लाभले. प्रसूतीनंतर तपासणी केली असता बाळास दोन पायाऐवजी दोन पाय जोडलेला एकच पाय आणि लिंग नसलेले शरीर आढळून आले. महिलेची प्रसूती अत्यंत नॉर्मल झाली असली तरी बाळाची प्रकृती चिंताजनक होती. अशा विचित्र अवस्थेत जन्मलेल्या बाळाला अवघे 15 मिनिटांचेच आयुष्य मिळाले.
Web Title: born fish angel in ambajogai

टॅग्स