मोबाईल विकल्याचा राग अनावर, बेदाम मारहाणीत आष्टीत मुलाचा मृत्यू

मारहाणीत बेशुद्ध झाल्याने १४ वर्षांचा लहूला नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र...
Beed Crime News
Beed Crime Newsesakal

आष्टी (जि.बीड) : माझ्या मुलाला तुझा मोबाईल का विकलास असा जाब विचारत करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी १४ वर्षीय मुलाचा नगर (Ahmednagar) येथे शासकीय रुग्णालयात उपचारांदरम्यान आज गुरुवारी (ता.तीन) सकाळी मृत्यू झाला. लहू लिंबराज खिळदकर असे मृत युवकाचे नाव असून आरोपी राजू खिळदकर याला पोलिसांनी कर्जत (जि.नगर) येथून ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की तालुक्यातील नांदूर (विठ्ठलाचे) येथील लहू खिळदकर या अल्पवयीन तरुणाने भावकीतून काका असणाऱ्या राजू खिळदकर यांच्या मुलाला मोबाईल संच विकला. आपल्या मुलाने न विचारता मोबाईल घेतल्याचा राजू खिळदकर याला राग येऊन तो संतप्त झाला. (Boy Died In Brutal Beating In Ashti Taluka Of Beed District)

Beed Crime News
Aurangabad : तलवार घेऊन नाचणाऱ्या नवरदेवाला बेड्या, अतिउत्साह नडला

त्याने लहू खिळदकर यास मंगळवारी (ता.एक) घरी बोलावून माझ्या मुलाला मोबाईल का विकलास, असा जाब विचारत लहूला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत बेशुद्ध झाल्याने त्याला नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा आज गुरुवारी सकाळी नगर येथे मृत्यू झाला. याबाबत मृत लहूचे वडील लिंबराज झुंबर खिळदकर यांनी अंभोरा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून राजू खिळदकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Beed)

Beed Crime News
जालन्यात तब्बल ३० एकरावरील ऊस जळून खाक,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

कर्जतमधून घेतले आरोपीस ताब्यात

दरम्यान, अल्पवयीन युवकाला बेदम मारहाण केल्यानंतर आरोपी राजू खिळदकर याने नांदूर येथून पोबारा केला होता. नगर येथे उपचारांदरम्यान लहू खिळदकर याचे वडील लिंबराज खिळदकर यांनी पोलिसांना बुधवारी (ता.दोन) रात्री उशिरा दिलेल्या जबाबावरून गुरुवारी (ता. तीन) सकाळी प्राणघातक हल्लाचा गुन्हा दाखल झाला. यानंतर पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरवत अवघ्या १२ तासांत आरोपी राजू खिळदकर यास कर्जत (जि. नगर) येथून ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com