पोहायला गेला अन् जीव गमवला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

शहरातील कोर्ट रोड जवळ राहणाऱ्या युवराज पवार यांचा सात वर्षांचा मुलगा बंटी हा सोमवारी दुपारी चार वाजता मित्रांसोबत  सिंदफणा नदीवरील नवीन पुलाजवळ असलेल्या पाण्यात पोहण्यास गेला.

माजलगाव (जि, बीड) : येथील सिंदफना नदीच्या पात्रात पोहावयास गेलेल्या सात वर्षीय बंटी युवराज पवार (वय सात) याचा गाळात फसल्याने  बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ३०) घडली.

शहरातील कोर्ट रोड जवळ राहणाऱ्या युवराज पवार यांचा सात वर्षांचा मुलगा बंटी हा सोमवारी दुपारी चार वाजता मित्रांसोबत  सिंदफणा नदीवरील नवीन पुलाजवळ असलेल्या पाण्यात पोहण्यास गेला. या ठिकाणी पुलाचे बांधकाम करणाऱ्या बांधकाम कंपनीने मागील वर्षी मोठा खड्डा खोदलेला आहे. त्यात गाळ व पाणी होते त्या मध्ये बंटी उतरला तो बाहेर आलाच नाही. पंधरा मिनिटानंतर ही तो बाहेर न आल्याने इतर मुलांनी आरडा ओरडा केला पण बंटी गाळात फसून त्याचा मृत्यू झाला होता. अखेर लोकांनी त्यास बाहेर काढले मुलाच्या या मृत्यूमुळे पवार कुटुंबास धक्का बसला आहे.

Web Title: boy drown in beed

टॅग्स