मोबाईल खेळायला न दिल्याने मुलगा घर सोडून गेला! 

Mobile_Addiction
Mobile_Addiction

औरंगाबाद - मोबाईल हल्ली प्रत्येकाच्या जीवनाचा भाग झाला आहे. अगदी झोपतानाही बाजुला मोबाईल हवा एवढी सवय मोबाईलची झाली आहे. लहान मुलांतही मोबाईलची फार क्रेझ दिसून येत असून अशातच एका मुलाला मोबाईल न दिल्याने तो घर सोडून गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे. हा प्रकार औरंगाबादेतील गारखेडा परिसरात 29 नोव्हेंबरला घडला. 

मुलांवर योग्य त्या वयात यथोचित संस्कार व्हावे म्हणून प्रत्येक पालक आग्रही असतो. अलीकडे मुलांचे मानिसक आरोग्य हा गहन प्रश्‍न बनला आहे. प्रोढांच्या हातीच असलेला मोबाईलचे आता खेळणे झाले आहे आणि हेच खेळणे मुलांच्या हाती आले आहे. मुलांना उत्सुकता म्हणून आणि रडतो म्हणून दिले जाणारे खेळणे त्यांच्याच आयुष्याचे खेळणे बनु शकतो. अशी उदाहरणेही औरंगाबादेत समोर आली आहे.

केवळ रडू नये आपल्या कामात अडचण करु नये म्हणून मुलांच्या हाती पालक सर्रास मोबाईल देतात. त्याचे दुष्पपरिणाम समोर येत असुन मोबाईल हातातून काढून घेतला की, अंग झोकुन जमीनीवर लोळण्यापर्यंतची कृती बालक करताना दिसून येत आहेत. मोबाईल परत दिला की, मग ते शांत बसतात. या मुलांना मोबाईल गुलाम बनवित असल्याचे काही घटनांवरुन दिसून येत आहे.

आता औरंगाबादेतच 29 नोव्हेंबरला घडलेली घटनाही अशाच प्रकारात मोडते. काबरानगर, गारखेडा भागात एक कुटुंब राहते. या कुटुंबातील मनोज नावाचा पंधरा वर्षीय मुलगा घर सोडून निघुन गेला. 29 नोव्हेंबरची ही घटना, घर सोडून जाण्याचे कारण काय तर तो मोबाईलचा हट्ट करीत होता, कुटुंबियांनी त्याला मोबाईल खेळायला दिला नाही. त्यामुळे तो नाराज झाला, हिरमुसला व रागाच्या भरात काही वेळातच घर सोडले.

तो घरी परतला नाही म्हणून कुटुंबियांची चिंता वाढली. त्याचा नातेवाईक, मित्रांसह ठिकठिकाणी शोध घेतला पण तो मात्र सापडला नाही. त्यामुळे हतबल झालेल्या त्याच्या कुटुंबियांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली व मुलाबाबत घडलेला प्रकार पोलिसांना कथन करीत तक्रार दिली. पोलिसांनीही रितसर तक्रार नोंदवित अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदविला. 

मुलांच्या गरजा समजून घेऊन आई-वडीलांनी एकवाक्‍यता ठेवणे. त्यांना वेळ देणे. स्वत: मोबाईलचा वापरावर नियम लावणे. छोट्या-छोट्या चुकीच्या गोष्टींवर जास्त ताणुन न धरणे. मुलांच्या कलेने संवाद साधल्यास अशा घटना व अनुचित प्रकार ठळु शकले.

- डॉ. संदीप सिसोदे, मानसोपचार तज्ज्ञ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com