अाधुनिक चुलीवर शेकतेय भाकरी

नवनाथ येवले
Friday, 8 November 2019

नांदेड : ग्रामिण भागात चुलीवर स्वयंपाक करणाऱ्यांची संख्या अजूनही बऱ्यापैकी आहे. मात्र आता या चुलीमध्ये बदल झाला असून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने आधुनिक चुली उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यामुळ या आधुनिक चुलीवर भाकरी शेकणार आहे. 

नांदेड : ग्रामिण भागात चुलीवर स्वयंपाक करणाऱ्यांची संख्या अजूनही बऱ्यापैकी आहे. मात्र आता या चुलीमध्ये बदल झाला असून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने आधुनिक चुली उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यामुळ या आधुनिक चुलीवर भाकरी शेकणार आहे. 

कृषी प्रधान देश म्हणून ओळख असलेल्या व आर्थिक व्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने देशाचा विकास नद्या, नाले, दऱ्याखोरे आणि जंगल या साधन संपत्तीवर अवलंबून आहे. नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. त्यामुळे वनसंपदा नष्ट होत आहे. जी वनसंपदा आहे ती नष्ट होऊ नये, या संपत्तीचे संवर्धन व वापर नियोजनपूर्वक झाले पाहिजे. तसेच जंगलतोड थांबण्यासाठी जनतेला पर्यायी ऊर्जास्रोत म्हणून बायोगॅस संयंत्र उभारणीवर शासनस्तरावरुन राष्ट्रीय बायोगॅस विकास प्रकल्पांतर्गत अधिक भर देण्यात येत आहे. 

राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन प्रकल्प कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात बायोगॅस संयंत्र उभारणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्यात जिल्ह्यातीन दोनपैकी नांदेड तालुक्यातील पहिला वाघी येथील बायोगॅस संयंत्र यशस्वी झाला अाहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भाकरी आता अाधुनिक चुलीवर शेकणार आहे. 
केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय बायोगॅस खत व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत वाघी (ता. नांदेड) येथील सुधाकर भोसले यांच्या शेतामध्ये या बायोगॅस संयंत्र उभारण्यात आले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत गुरुवारी (ता. सात) सभापती सुखदेव जाधव, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी उद्‍घाटनाच्या निमित्ताने सुधाकर भोसले यांच्या बायोगॅस संयंत्रावर शेकलेल्या भाकरीचा अास्वाद घेतला.     

महिलांचे जीवनमान उंचावले

बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना अनुदान मिळते. ग्रामीण महिलांचे जीवनमान उंचविण्यासाठी सर्वसाधारण लाभार्थ्यास दोन ते सहा घनमीटर संयत्रास नऊ हजार रुपये, अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यास दोन ते सहा घनमीटर संयत्रास अकरा हजार रुपये अनुदान मिळते. विशेष म्हणजे, शौचालय जोडलेल्या बायोगॅस संयत्रास अतिरिक्त केंद्रीय सहाय्य म्हणून बाराशे रुपये अनुदानाची तरतुद आहे. 

बायोगॅस संयत्रास शौचालय जोडून ग्रामीण भागातील स्वच्छता राखण्यास मदत होते. तसेच या सेंद्रीय खतामुळे जमिनीची पोत सुधारत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे. श्री भोसले यांचे बायोगॅस संयंत्र नवीन टेक्नॉलाजीने दोन घनमीटर क्षमतेचे आहे. बायोगॅस संयंत्राची माहिती देताना सुधार भोसले यांनी इंधन खर्चाची बचत, जीवितहानीचा धोका नाही, प्रदूषण मुक्त बायोगॅस प्रोजेक्ट उपयुक्त ठरत असल्याचे समाधान व्यक्त केले.

उपयुक्त बायोगॅस संयंत्र

उपयुक्त बायोगॅस संयंत्र नांदेड तालुक्यामध्ये जास्तीत शेतकऱ्यांना बसून देण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन व जिल्हा परिषद स्तरावर प्रयत्नांचे अाश्‍वासन पंचायत समितीचे सभापती सुखदेव जाधव, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी दिले. विस्ताराधिकारी श्री. कांबळे, विस्तार अधिकारी (कृषी) सतीश लकडे, सुदाम भोसले, यशदेव भोसले आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती. 
 
गोबरगॅस काळाची गरज
गोबर गॅस स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस मिळण्याचे सर्वात स्वस्त साधन आहे. गावखेड्यात स्वयंपाकासाठी आजही इंधन म्हणून लाकूड, गोवऱ्या, पिकाचे अवशेष (तुराट्या) याचा वापर केला जातो. या पारंपारिक इंधनाच्या वापरासही मर्यादा असून सदर इंधन हे सहज उपलब्ध होणे कठीण झाले आहे. या इंधनाचा वापर आरोग्यास हानीकारक आहे. पिकांच्या अवशेषाचा इंधन म्हणून वापर करणेही योग्य नाही. आधीच रासायनिक खतामुळे जमिनीची सुपिकता कमी होत आहे. यामुळे गोबर गॅस काळाची गरज बनली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bread roasting on modern choli